'What is Maturity'
What is #MATURITY
#प्रगल्भता म्हणजे काय ?
१ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.
२ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.
३ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.
४ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.
५ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.
६ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.
७ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटवुन देण्याच्या भानगडीत पडत नाही.
८ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.
९ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.
१० प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.
११ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो.
१२ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने, आपुलकीने बोलता आणि वागता.
१३ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं कधीही न सुटणारे प्रश्न सोडून देता.
१४ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.
१५ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं स्व:ताहुन निरपेक्ष भावनेने, मनापासून कौतुक करता.
१६ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.
१७ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं अंतरीक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.
१८ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या जागेवर आहात असे समज़ुन दुसऱ्याचा विचार करता.
-------------------
Comments
Post a Comment