आयुष्य धोक्याचं

धोके

हसण्यामध्ये मूर्ख ठरण्याचा धोका असतो , रडण्यामध्ये हळवं ठरण्याचा धोका असतो.....
भेटण्यामध्ये एकमेकात गुंतण्याचा धोका असतो
...भावना व्यक्त करण्यात स्वतःचा खरा स्वभाव प्रकट होण्याचा धोका असतो।
लोकांसमोर तुमचे विचार, तुमची स्वप्न जाहीर करण्यात ते गमवण्याचा धोका असतो…
प्रेम करण्यात प्रतिसात न मिळण्याचा धोका असतो    
जगण्यात मारण्याचा धोका असतो
आशेत निराशेचा धोका असतो...
प्रयत्न करण्यात अपयश येण्याचा धोका असतो....
पण धोके हे पत्करलेच पाहिजे,
कारण कोणताच धोका न पत्करण हेच खूप धोकादायक असतं....
जो माणूस कोणताही धोका पत्करत नाही,कोणतीही कृती करत नाही,
त्याच्याकडे काहीही नसत,त्याच्या आयुष्याला कसलाही अर्थ नसतो...
ते यातना आणि दुःख टाळू शकतील पण ते इतरांच्या भावना,दुःख समजून घ्यायला,बदलायला, मोठे व्हायला प्रेम करायला किंवा आयुष्य जगायला शिकणार नाहीत.....

#धोके_स्वीकारणारा_माणूस_खऱ्या_अर्थाने_स्वतंत्र व स्वावलंबी असतो...

Comments

Popular posts from this blog

विद्रोही तुकाराम

मासिक पाळी, माझी आणि तिची

रक्तदाता यादी