विद्रोही तुकाराम
💐💐🙏🏼 *संत तुकाराम* 🙏🏼💐💐
*मुहूर्ताची वेळ*
कोणती वेळ कामासाठी योग्य या बद्दल तुकोबाराय यांनी या अभंगात सांगितले आहे .....
पंचांगाच्या मागे। लागतो अडाणी,
पाहे क्षणोक्षणी। शुभाशुभ ॥१॥
मूर्ख भट म्हणे। त्याज्य दिन आज,
दक्षिणेची लाज। बाळगेना ॥ २॥
कामचुकारांना। धार्जिणे पंचांग,
सडलेले अंग। संस्कृतीचे ॥३॥
मुहूर्ताचे वेड। मूर्खांना शोभते,
आयुष्य नासते। पंचांगाने ॥४॥
चांगल्या कामाला। लागावे कधीही,
गोड फळ येई। कष्ट घेता ॥५॥
दुष्ट कामे केली। शुभ वेळेवरी,
माफी नाही तरी। शिक्षेतुनी ॥६॥
वेळ, हवा पाणी। आकाश बाधेना,
भटांच्या कल्पना। शुभाशुभ ॥७॥
विवेकाने वागा। होऊनी निर्भय,
अशुभाचे भय। निर्बुद्धीना ॥८॥
सत्य सांगा लोका। जरी कडू लागे,
चाला, नाही मागे। आला कोण ॥९॥
- *संत तुकाराम*
तुकाराम महाराजांचा वरील अभंग जवळच्या नातेवाईक व समाजबांधवांना समजावून सांगितल्यास मोठे समाजकार्य होईल.
समाज्यात आपली निश्चितच विश्वासार्हता वाढेल.
*सत्य सांगा लोका। जरी कडू लागे*,
*चाला, नाही मागे। आला कोण* ॥९॥
- *संत तुकाराम*
या अभंगाचा संदर्भ द्याल का गाथे मधील किती क्रमांकाचा अभंग आहे हा?
ReplyDeleteवरील रचना संत तुकारामांची असल्याचा उल्लेख करुन ही रचना भक्तांच्या माथी मारली जाते मात्र सदरील रचना कोल्हापूर येथील जे.बी. शिंदे यांची आहे.
ReplyDeleteमुळात असं काहीतरी लिहायचं आणि ते ज्ञानोबा - तुकोबा - चोखामेळा यांच्या नावावर खपवायचं हा उद्योग म्हणजेच विद्रोह ....
बरोबर आहे आपले......
Deletehttps://satyashodhak.com/the-sham-of-alamanc/
ReplyDelete