आठवणींची साठवण
तुझीच आठवण
आणि त्यांची साठवण
करत करत जगत आहे १
माझ्या मोकळ्या अवकाशात
आठवणींचे तारे
जोडत जोडत जगत आहे २
जेव्हा कुणीच नसतं तेव्हा फक्त तूच असतेस
आणि
जेव्हा तू असतेस तेव्हा मात्र कुणीच नसतं
रोज नवी आठवण घेऊन तू स्वप्नात येत असतेस
स्वप्नातून तू सत्यात
आणि माझ्या आयुष्यात
अवतरावं हीच वाट
पाहत पाहत जगत आहे ३
आयुष्य सुखी होण्या कारणा
तू सोबत हवी ही धारणा
आता मन माझे करीत आहे
सुंदर आयुष्याच्या कल्पनेसाठी
तुझ्याचकडून प्रेरणा
घेत घेत जगत आहे ४
साखरझोप माझी
तुझ्या आठवणीने अजून गोड होत असते
कुशीत माझ्या उशी लाजेने चुर
होत असते
व्यक्त होतो मी तुझ्यापाशी,
तुझ्यासाठी, तुझ्याचरूपाने
माझ्या नजरेच्या आरश्यात बघ एकदा,
मलाच मिळवशील माझ्याशी,
मला पाहून स्वतः मधे
उत्कटतेची ही भावना
लपवून ठेवणे कठीण आहे
तुझ्यासाठी काव्य रूपाने व्यक्त
होत होत जगत आहे ५
इथे अपेक्षित नाही रोज रोज भेटणे
रोजचेच हाय हॅलो, तेच तेच बोलणे,
हृदयाच्या एका कोन्यातून
ती ही मला आठवत असेल
आणि माझी आठवण
मनी साठवत असेल
अशी भाबडी आशा
करत करत जगत आहे ६
❤ दिल से ... ✍🏻 कलम से
✍🏻©विनायक
Comments
Post a Comment