घंटा वाजली तरी घंटा उपयोग नाय...!

सागरी तापमानवाढीमुळे मालदीवमधील प्रवाळ बेट नष्ट

वर्षभरापूर्वी मालदीवमध्ये असलेले प्रवाळ बेट आता नष्ट झाल्याचे दिसून आले आहे. वाढत्या सागरी तापमानामुळे हा परिणाम होत असल्याचे संशोधकांचे मत आहे.

जगातील प्रवाळबेटे नष्ट होत असून ती परिसंस्थात्मक दुर्घटना आहे. जगात गेल्या तीस वर्षांत निम्मी प्रवाळबेटे नष्ट झाली आहेत. आता उरलेली प्रवाळ बेटे निदान तीन दशके तरी टिकून राहावीत अशी संशोधकांची अपेक्षा आहे. प्रवाळ बेटांचे अस्तित्व हे पृथ्वीला उपकारक असते कारण त्यामुळे सागरी प्रजातींना फायदा होत असतोच. शिवाय जगातील अब्जावधी लोकांना त्याचा लाभ मिळतो. आतापासून शंभर वर्षांनी सर्व प्रवाळ बेटे नष्ट होतील व हा लाभ मिळणार नाही अशी भीती कॅनडाच्या व्हिक्टोरिया विद्यापीठातील सागरी जीवशास्त्रज्ञ ज्युलिया बॉम यांनी म्हटले आहे. आपण प्रवाळ बेटे वेगाने गमावित चाललो आहोत व त्याचा वेग कल्पनेपेक्षा अधिक आहे. जगात आता जागतिक तापमानवाढ थांबली असे गृहित धरले तरी २०५० पर्यंत ९० टक्के प्रवाळ बेटे नष्ट झालेली असतील. त्यामुळे खूप मोठी उपाययोजना केली गेली तरच ही बेटे वाचू शकतात.

 मानवी वंशच या प्रवाळ बेटांच्या नष्ट होण्याने धोक्यात येऊ शकतो, असे हवाई इन्स्टिटय़ूट ऑफ मरीन बायॉलॉजीचे संचालक रूथ गेट्स यांनी सांगितले. प्रवाळ बेटे ऑक्सिजनची निर्मिती करतात. पाण्याखालील पर्जन्य जंगले असे त्यांचे वर्णन केले जाते. चार पैकी एका सागरी प्रजातीला प्रवाळ बेटात आसरा मिळत असतो. वादळांपासून किनाऱ्यांचे रक्षण करण्याचे कामही ही बेटे करतात. या बेटांवरील पर्यटनातून अब्जावधी डॉलर्स मिळतात तसेच मासेमारीतूनही पैसा मिळतो. तेथील काही घटकद्रव्ये कर्करोग, संधीवात व विषाणूजन्य तापात वापरली जातात. उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या सर्वच भागात प्रवाळबेटांची स्थिती चिंताजनक असल्याचे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या ग्लोबल चेंज संस्थेचे संचालक ओव्ह होग गुल्डबर्ग यांनी म्हटले आहे. प्रवाळ हे अपृष्ठवंशीय असतात व ते कॅल्शियम काबरेनेट बाहेर टाकत असतात त्यामुळे त्यांना संरक्षक कवच मिळते, ती कवच रंगीत असतात कारण त्यांच्या शरीरातील उतींमध्ये एक शैवाल असते त्यामुळे त्यांना ऊर्जा मिळत असते. प्रवाळ हे तापमानाला संवेदनशील असतात व सागराचे वाढते तापमान, आम्लीकरण, अति मासेमारी व प्रदूषण यांचा त्यांच्यावर वाईट परिणाम होतो.

हे झालं भारताजवळच्या मालदीव चे उदाहरण आता जगाच्या पाठीवर काय चाललंय पाहूया


पुढारी मधील 20 मे ची बातमी पहा

अंटार्क्टिकच्या द्विपकल्पावर नवीन प्रकारचा परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. बर्फ कमी होत असलेल्या भूभागाची जागा मॉस वर्गीय वनस्पती घेत आहे. :  मॅट ॲमसब्युरी


अंटार्क्टिक म्हटले की डोळ्यासमोर येणारे चित्र म्हणजे फक्त बर्फ आणि बर्फ! बर्फांचे कडे आणि निळाशर समुद्रावर तरंगणारे महाकाय हिमनग म्हणजे अंटार्क्टिक! पण हे चित्र आता बदलू लागले आहे. अंटार्क्टिकच्या काही भागात संशोधकांना मॉस वर्गीय वनस्पती वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामागे एकमेव कारण म्हणजे तापमान वाढ असल्याचे संशोधकांना वाटते. ही परिस्थिती अशीच राहिली तर अंटार्क्टिकचे भवितव्य हिरवेगार असणार आहे. 

युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटेरचे संशोधक मॅट ॲमसब्युरी म्हणाले, ‘अंटार्क्टिकच्या द्विपकल्पावर नवीन प्रकारचा परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. बर्फ कमी होत असलेल्या भूभागाची जागा मॉस वर्गीय वनस्पती घेत आहे.’ 

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात अंटार्क्टिकच्या द्विपकल्पावरील तापमान वाढत आहे. प्रत्येक दशकात अर्धा टक्का इतके तापमान वाढलेले आहे. अंटार्क्टिकामध्ये एकूण भूभागाच्या ०.३ टक्के इतक्याच भागावर वनस्पती जीवन आहे. या ठिकाणी मॉस वर्गीय वनस्पती आढळतात. येथील पर्यावरणांच्या बदलाला वनस्पती कसा प्रतिसाद देतात ? याचा संशोधक अभ्यास करत आहेत. 

‘करंट बायॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या रिसर्च पेपरमध्ये ब्रिटनमधील ३ विद्यापीठाच्या संशोधकांनी या विषयाची मांडणी केली आहे. गेल्या १५० वर्षांच्या परिस्थितीचा अभ्यास करणे संशोधकांना शक्य झाले आहे. मॉसची वाढ किती झाली आहे? त्यांच्या वाढीचा वेग किती? या वनस्पतीमधील कार्बनचे प्रमाण किती? अशा विविध बाजुंनी अभ्यास करण्यात आला आहे. कार्बनच्या प्रमाणावरून येथील परिस्थिती प्रकाशसंश्लेषणासाठी कशी पोषक आहे? याचा अभ्यास करता आला आहे. 

या अभ्यासावरून अंटार्क्टिकमध्ये गेल्या ५० वर्षात झालेल्या तापमान वाढीमुळे जैवीक घाडोमोडींचा वेग प्रचंड वाढला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. १९५० च्या पूर्वीची परिस्थिती पाहता हा वेग चार ते पाच पट अधिक असल्याचा या संशोधकांचा दावा आहे. अंटार्क्टिकच्या उत्तरेकडील टोकावर हा अभ्यास करण्यात आला आहे. यापूर्वी २०१३ मध्ये अंटार्क्टिक द्विपकल्पाच्या पश्चिमीकडील अलेक्झांडर बेटावर अशा प्रकारचे संशोधन झाले होते. अलेक्झांडर बेटावरील संशोधनातील निष्कर्षांना नव्या संशोधनाने बळकटी मिळाली आहे.  

‘आम्ही ज्या ज्या ठिकाणी संशोधन केले त्या सर्वच ठिकाणांवरून समान निष्कर्ष निघत आहेत. जवळपास १ हजार किलोमीटर अंतराच्या टप्प्यात ही पाहणी झाली आहे. साहजिकच मॉसचा हा प्रतिसाद तापमानातील बदलांना असल्याचे आम्ही अधिक खात्रीपूर्वक सांगू शकतो.’

भविष्यातील तापमानातील थोडी वाढ सुद्धा अंटार्क्टिकच्या इकोसिस्टमवर मोठे बदल घडवू शकेल असे या संशोधकांना वाटते. 
यावर काम करणारे दुसरे संशोधक थॉमस रोलँड म्हणाले, ‘जे काही दिसून आले आहे ते काळजी वाटण्यासारखेच आहे. जर असेच घडत राहिले तर या दुर्गम आणि अस्सल भागाचा मुळचा चेहरा हरवून जाईल.’

घंटा वाजली आहे पण आपल्याला जाग कधी येणार हाच मोठा प्रश्न आहे. 

Comments

Popular posts from this blog

विद्रोही तुकाराम

मासिक पाळी, माझी आणि तिची

रक्तदाता यादी