CMRDF

आज माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस असं म्हणायला हरकत नाही कारण आज महाराष्ट्राची प्रशासनाची शिखर प्रशिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे ( यशदा) http://www.yashada.org/

येथे अनेक जेष्ठ व मोठ्या व्यक्तींना जवळून भेटण्याचा योग आला
त्यात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, हिवरे बाजार चे आदर्श सरपंच मा पोपटराव पवार, ग्रामविकास राज्यमंत्री मा दादाजी भुसे
यांनी मोलाचे मार्गदर्शन केले,
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पंकजाताई मुंडे यांना प्रत्यक्ष समोरून ऐकले,
प्रसिद्ध अभिनेते व पाणी फौंडेशन चे संस्थापक अमीर खान यांच्याशी live चर्चा झाली,
असा योग येण्याचं कारण म्हणजे आज 2 एप्रिल 2017 रोजी ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन तसेच मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रम चा उदघाटन समारंभ यशदा पुणे येथे करण्यात आला होता
आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या जवळजवळ 4000 तरुण तारुणांपैकी 180 तरुण ग्रामविकास फेलो म्हणून निवडले गेले होते आणि मी सुद्धा त्या भाग्यवान तारुणांपैकी आहे ज्यांना हि सुवर्णसंधी मिळाली आहे

तर हे मिशन नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील link वर क्लीक करा

https://www.maharashtra.gov.in/cmrdfp2016/fp.html

तर अशी संधी फार दुर्मिळ असते आणि आव्हानात्मक सुद्धा

कारण समाजसेवा हे असं क्षेत्र आह जेे की लोक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हाती घेतात

अनेक मोठी लोकं त्यांना त्यांच्या तारुनवयात अशी संधी मिळाली नाही म्हणून आजही हळहळतात, अन आम्हाला तर आयती संधी उपलब्ध आहे
आता माझी वेळ आहे त्या संधीचं सोनं करायचं आणि मला खात्री आहे की मी ते करणारच

दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक उत्तरदायित्व या विषयावरवर फक्त चर्चा फार होतात पण कृती फार थोडी ,
भारताचा झेंडा घेऊन गाडीवरून फिरणे, मोठ्याने घोषणा देणे म्हणजे देशभक्ती न्हवे,
सीमेवर जवान बाहेरच्या शत्रूपासून  मातृभूमीच्या रक्षणार्थ शहीद होतात, पण गरिबी, निरक्षरता, आरोग्य समस्या, कुपोषण, बेरोजगारी, जातीव्यवस्था, अंधश्रद्धा या देशाच्या आतील शत्रुं पासून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी खुप कमी लोक उभे राहतात
आज देशाला स्वातंत्र मिळून 70  वर्षे होतील पण अजून आपण अपेक्षित यश व विकासाचे उद्दिष्ट गाठू शकलो नाही
आज देशाला खरी गरज कशाची असेल तर ती अधिकाधिक तरुणांनी स्वयंप्रेरणेने सामाजिक क्षेत्रात, समाजकारणात , राजकारणात , उद्योगक्षेत्रात प्रवेश केला पाहिजे,
हे देशातील अंतर्गत समस्यारूपी शत्रूविरुद्ध युद्ध पुकारण्यासारखे असेल आणि आपण सर्व सामाजिक सैनिक या युद्धात झोकून देऊन काम करू हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो

बरेचजण त्यांच्या कार्य क्षेत्रात दोन पद्धतीने आले असतात by force or by choice
आपण स्वतःला विचारायचे आपण कुणापैकी आहोत,
आयुष्य एकदाच मिळते ते फक्त खाऊन पिऊन मज्जा करून जगायचं की आपल्या बुद्धीचा क्षमतेचा वापर करून समाजाच्या उन्नतीच ध्येयं घेऊन जगायचं
हे ज्याचं त्यानं ठरवायचं

आपण या जगात आलो तेव्हा आपण रडत होतो व जग हसत होते, पण जाताना मात्र आपण हसत असू व जग रडत असेल
खूप अति प्रमाणात कमवायच्या नादि नका लागू ,क्यों कि कफन को जेब नहीं होती
आणि जगायला तर फार थोडं लागतं हो

आयुष्यात खुप कमी वेळा अशी संधी मिळते जेथे स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करायची गरज पडते, आणि अशी संधी धाडसी लोक सोडत नाहीत त्या संधीचं ते सोनं करून दाखवतात

तर आम्हाला ग्रामीण महाराष्ट्रातील समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी त्या लोकांच्यात राहून काम करायचे आहे , महाराष्ट्र सरकार खंबीर पणे आमच्या पाठीशी उभे आहे आणि ही एक सुरुवात आहे, नांदी आहे बदलाची , परिवर्तनाची आणि शाश्वत विकासाची

धन्यवाद

आपलाच,
विनायक महादेव साळुंखे ,
मु पो मिरजवाडी, ता वाळवा, जि सांगली
मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो
(2nd batch)

WP मो न-ं 7588167721
FB - vinayaksalunkhe21@gmail.com

Comments

Popular posts from this blog

विद्रोही तुकाराम

मासिक पाळी, माझी आणि तिची

रक्तदाता यादी