नातेसंबंध उलघडताना....
नैराश्य येण्याची दोन प्रमुख कारणे असतात :-
१. आयुष्यात आपलं असं कोणीच नसणे .
२. ज्यांना आपण आपले आयुष्य मानतो , त्यांच्या आयुष्यात आपल्याला जागा नसणे .
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्त 'नैराश्य ' हा विषय घेण्यात आलेला आहे . नैराश्य हे विविध पातळी वरील असले तरी संवादाचा होणारा संवादाशी होणारा संवाद किंवा न बोलताही बरेच काही समजून उमजून घेण्याचा भावनांचा अविष्कार यांना वैयक्तिक आयुष्यात खूप महत्व आहे . त्यामुळे यावरच थोडी मतं शेअर करतो -
सध्या प्रत्येक वृत्तपत्रात 'नातं कसं टिकवावं ' यावर पानभर सल्ले दिले जातात . आजवर वाचनात न आलेला पण प्रत्येक नात्यात आवश्यक असलेला मुद्दा त्यातून सुटलेला असतो . कोणत्याही नात्यात आपण गुंतत असताना ते नातं आपल्याला 'डिफाइन ' करता आलं पाहिजे . आय लव्ह यु . . ठीक आहे पण व्हाय यु लव्ह मी यावर १० मिनिटे विचार करून पण उत्तर ' आय जस्ट लव्ह यु यार ' हे उत्तर असेल तर नातं डिफाइन नाही आहे . अर्थात ' दुपारी बाराच्या उन्हात सूर्यनारायण त्याच्या तेजस्वी किरणांनी अंगाची लाही लाही करत असताना तू दिसलीस आणि अंगातून वाहणाऱ्या घामाला गुलाब पाण्याचा वास येऊ लागला . . उन्हाच्या झळा जणू शीतल चांदण्यात रातराणीच्या फुलावरून येणाऱ्या हवे सारख्या वाटू लागल्या ' वगैरे सगळ्यांना जमत नाही .पण एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तर ते 'वेळीच ' व्यक्त करणं आणि ती आपल्याला का आवडते हे आपल्याला माहित असणं 'नातं घट्ट ' करतं . . पण एखादी व्यक्ती आवडली तर का आवडली ? एखादी व्यक्ती आपली जोडीदार म्हणून स्वीकारल्या नंतर तिला /त्याला आपण का स्वीकारले यामागच्या कारणांचा कायम 'आदर ' असायला हवा . नाहीतर ऑप्शन होते की बरेच पण हीच व्यक्ती का ?? याचे उत्तर 'आकर्षण ' हे नसेल तर नात्यात आणि आवडण्यात 'प्रेम ' नक्कीच असते . नात्याला तडा जात नाही आणि नैराश्य येत नाही .
सध्याच्या काळात बहुतांशी लोकांची 'पाटी कोरी ' नसते .पूर्वी कधी एखादे प्रेम झालेले असते . फसलेले असते त्यामुळे आयुष्यात पुन्हा तो मार्ग नकोच अशी स्वाभाविक भावना होते . मी कितीही माझं माझं बघू शकतो /शकते असं असलं तरी आयुष्यात कोणीतरी आपलं हक्काचं असं लागतंच . पूर्वी फसलं म्हणून पुढेही फसेल असं कधीच नसत . पूर्वी फसलं किंवा पुढे फसू शकत कारण रिलेशन डिफाइन्ड नसत . त्यात प्रेम असेल पण आदर नसतो . समजून घेण्याची अपेक्षा असते पण समजूतदार पणा नसतो . आपल्या जोडीदारापेक्षा 'सल्लागार मंडळावर ' विश्वास अधिक असतो . मस्त पैकी 'स्पाय गिरी ' सुरु असते . यातून मिळते काय ?? ब्रेक अप . ...
या ब्रेक अप चे परिणाम मनावर खोलवर होतात .' आता नाहीच ' हा अट्टाहास समोर उभ्या असलेल्या सुखाला संधीला बाय बाय करून टाकतो . जुनं नातं पुन्हा आयुष्यात यावं अशी आशा सुद्धा असते . नातं एकवेळ परत येईल पण गमावलेल्या विश्वासाचं काय ? तो कधीच कमावता येत नाही . . तो कमावण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे का ? कशाला ? किती वेळ ? मीच का ? आशा असंख्य प्रश्नांना जन्म .नात्यात धरसोड अजिबात नसावी पण समोरच्याची आपल्या बद्दलची आणि आपल्या भावनांबद्दलची मते किती 'सोडीव ' ( केजुअल / टेकन फॉर ग्रांटेड / आय डोन्ट केअर / गेट लॉस्ट वगैरे ) हे समजल्यावर पुन्हा तेच नाते धारायचाही प्रयत्न करू नये कारण तो प्रवास एकतर्फी असतो . बहुतेकदा . . . हेच सगळे वृत्तपत्राच्या रकान्यातून सुरु असते . . लेख अजून लांबवत नाही . . पण वैयक्तिक (बॉय फ्रेंड -गर्ल फ्रेंड , नवरा -बायको , मित्र -मैत्रीण इत्यादी ) आयुष्यात नैराश्य नको असेल तर खालील गोष्टी महत्वाच्या -
१. आदर (Respect )
२. जबाबदारी (Responsibility )
३. पाठिंबा (support)
४. समजूतदारपणा (Understanding )
५. प्रेम (Love )
आदर , जबाबदारी , पाठिंबा , समजूतदारपणा हे 'ऑप्शनल ' असेल तर प्रेम असले काय किंवा नसले काय त्याचा काहीच उपयोग होत नाही . आणि आदर , जबाबदारी इत्यादी नात्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी कोणतीही औषधाची गोळी तुम्हाला देऊ शकत नाही .
आपले नाते आपण डिफाइन करा . त्यात आलेल्या अडचणींची उत्तरे वृत्तपत्रात न शोधता जोडीदारासोबतच्या संभाषणात शोधा . स्पेस किंवा टाइम हा नातं स्ट्रॉंग करण्यास आहे की वीक याचा विचार करा . वैयक्तिक आयुष्यातले नैराश्य , व्यावसायिक आयुष्यात आनंद देतेच असे नाही . . जरी व्यावसायिक प्रगती होत राहिली तरी ती एन्जॉय किंवा सेलिब्रेट कोणासोबत करायची हा प्रश्न अनुत्तरित राहतो . . . यातून आलेल्या नैराश्याचे काय करायचे ??
Comments
Post a Comment