" नाही म्हणणार, भारतमाता की जय "

" नाही म्हणणार, भारतमाता की जय "
~~~~~~~~~~~~~~~~~~~

- संजय पवार
(दैनिक पुण्यनगरी)

    अजिबात इच्छा नसताना हा विषय लिहावा लागतोय , कारण स्वातंञ्यानंतर गेली ६० वर्षे हा प्रश्न कधीस उद्भवलाच नाही .' वंदे मातरम् ' म्हणणार नाहीवाली बनातवालांची पिढी गेली आणि त्यांना दम देणाऱ्या मोठ्या ठाकरेंची पिढीही गेली ; पण विकासाचा मुखवटा लावून गोंडस भासणारे मुख्यमंत्री पक्षाच्या अधिवेशनात स्वतःचा भेसूर चेहरा दाखवतात , तेव्हा समाचार घ्यावाच लागणार .
  भारतमाता की जय बोलणार नाहीत , त्यांना या देशात रहायचा अधिकार नाही ! हे कोण बोलतंय? संघस्थानावर वाढलेले आणि त्यांच्याच राजकीय फळीत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि सद्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .
    हे कोण भारत माता की जय म्हणा सांगणारे ? इंग्रजांशी लढून , सनदशीर मार्गाने , अहिंसक क्रांती करुन ( काही क्रांतिवीरांच्या सशश्र क्रांतीसह ) स्वराज्य मिळविले.१९४७ साली तिरंगा फडकवला , तेव्हा हे सगळे अर्ध्या चड्ड्या घालून , स्वतंञ आंदोलनाकडे पाठ फिरवून आणि हिटलरकडे तोंड करुन हिंदू राष्ट्रासाठी कवायत करत होते. जी काही तथाकथित ' भारतमाता ' हे सांगतात , तिची मुक्तता करताना हे नव्हतेच ! आणि आता ही अरेरावी ?

    त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रासाठी आंदोलन झाले. मुंबईचा शेतकरी , कामगार यात प्राणपणाने लढला, स्वकियांच्या गोळ्या खाल्ल्या ; पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव उधळला , तेव्हाही हे कुठेच नव्हते आणि आता त्याच मुंबईत , विधानसभेत सांगता , भारतमाता की जय  म्हणा ?
कुठल्या अधिकारात ? ना या देशासाठी तुम्ही लढलात , ना महाराष्ट्रासाठी ! तरीही वर ही शिरजोरी ? लोक ऐकून घेताहेत म्हणून वाट्टेल ते बोलत रहाल , वाद वाढवित रहाल , तर एक दिवस त्याचं असं उत्तर मिळेल की , भारत मातेचं दूध आठवेल !

   का म्हणायचं आम्ही भारतमाता की जय ? आणि तुम्ही म्हणता म्हणून तर अजिबात नाही म्हणणार .

तुमचा मनुचा डीएनए आता प्याथॉलॉजी लँबमध्ये न जाताही दिसू लागलाय. महिला मंदिरात प्रवेश करणार म्हणून देव पाण्यात ठेवणारे तुम्ही , तुम्ही भारतमातेबद्दल बोलता ?

स्वतःच्याच आईबहिणींच्या नैसर्गिक स्थितीला विटाळ मानून त्यांना देवदर्शन काय , घराबाहेर चार दिवस बसवणारे तुम्ही , तुम्ही भारतमातेबद्दल बोलता ? 
   तुम्ही स्रीला शिक्षणाचा अधिकार नाकारलात , तिला सती चढवलेत , केशवपन करुन विद्रुप केलेत , पुनर्विवाहास बंदी घालून , घरातल्या घरात तिला नासवलीत , तुमच्या या कर्तृत्वाची ' बाळंतपणं ' फुले दाम्पत्यांनी केली. त्यांनी केशवपनविरोधात न्हाव्यांचा संप घडविला आणि मुलींसाठी शाळाही काढली , हे सगळं होतांना तुम्ही मनुस्मृतीसह , तुमचा वैदिक धर्म , रुढी , परंपरा सांभाळत , सुधारकांवर अश्लाध्य भाषेत बोलत , शेण ,दगड विटांचा मारा करत होतात ! आणि तुम्ही आम्हाला सांगता भारतमाता की जय ?

    जगातील सर्वात अमानुष , राक्षशी प्रथा ' अस्पृश्यता ' तुमच्या धर्माच्या चातुर्वर्णाची देन ! माणसांचा विटाळ धरणारी , त्यांना शूद्र म्हणणारी , त्यांना शिक्षणाचाच काय प्यायच्या पाण्याचाही आधिकार नाकारणारी तुमची संस्कृती आणि धर्म , तरीही वाक्प्रचार काय तयार करता ? तर अस्मानी आणि सुलतानी संकट ! आजही इथल्या दलित , भटक्या विमुक्तांना ज्यांना जन्मजात गुन्हेगार मानले जाते, जे पोलीसी छळाचा बळी ठरतात , त्या सर्वांसाठी तुम्ही काय सुलतानीपेक्षा कमी आहात ? आणि हे सर्व या मातीतले , तुम्ही बाहेरुन आलेले , आजही ' ज्यूं' शी तुलना करणारे तुम्ही , तुम्हाला अधिकारच काय कुणी काय बोलावं हे सांगण्याचा ?
   मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे नेमाडेंच्या कादंबरीतला मोठा मेंदू छोटा आणि छोटा मेंदू मोठा असलेला देशपांडे ! त्याचे प्रमुख सरसंघचालक काहीही बोलतात आणि त्यावर प्रतिक्रिया उमटतात !

भाजपा , अभाविप, वनवासी आश्रम ही सगळी यांचीच आपत्ये; पण वेळ आली की आम्ही वेगळे, आमचे निर्णय आम्ही घेतो ! ..वगैरे गुळमुळीत उत्तरे ! राम मंदिराच्या नावावर विहिंप आडून विद्वेश पसरवणे, पैसा जमवणे असले उद्योग केले! आज राम मंदिर ही प्रायॉरिटी नाही ; पण ते आम्ही बांधणारच! कार्य काय संघाचं ? वनवासी आश्रम ? हे कधी झालं ? जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि बुध्द धर्माची पुनर्स्थापणा केली, तेव्हा यांच्या पायाखालची जमीन सरकली ! तेव्हा त्यांच्या चालीरीती ,देव , नाव बदलून ब्राह्मणी हिंदूकरण केलं ! याला हे सेवा कार्य म्हणतात ! त्यासाठी परदेशी ब्राह्मण नियमित निधी पाठवतात. त्यावर यांचे नवसंस्कारवर्ग चालतात.

      यांचं हिंदुत्व हे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासारखं नाही. मावळ्यांचा राजा , बारा बलुतेदारांचा राजा , कुळवाडी भूषण राजा ..यांनी ' गोब्राह्मण प्रतिपालक ' केला !
म्हणजे शिवाजी महाराज मोगलांशी लढले ते गायी आणि ब्राह्मण वाचवण्यासाठी ! वर पुन्हा हे त्यांना राज्याभिषेक करायला नकार देणार ..आणि आता हे आम्हाला सांगणार ..?

भारतमाता की जय म्हणा नाही तर येथे राहू नका ? किमान बोलण्याआधी आरशात तरी बघायचं ?

     इतके दांभिक, इतके बिनकण्याचे आणि शब्द फिरवणारे लोक जगाच्या पाठीवर कुठे नसतील .उठसूठ बाबासाहेबांचे आणि संविधानाचे नाव घेतात. कोर्टात शपथपञ देतात आणि नंतर मंदिरात जाणाऱ्या महिलांना पोलीसी बळाने हाकलून देतात ?
हे तुमचं बेटी बचाव ,बेटी पढाव ?
हा तुमचा नारी सन्मान  ?

    कसली कुणाची भारतमाता ?
बैल कापला म्हणून माणूस मारता ?
दलित पोरगं लग्नात घोड्यावर बसलं म्हणून झोडपून काढता ?
मंदिर प्रवेश करणाऱ्या बायांवर पोलीस घालता ?
आणि यांच्या नादाला लागून गावच्या बाया या महिलांनाच शिव्याशाप नि मार देतात ?

    गावकरी बायांनो ..म.फुले ,साविञीबाई फुले , शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे संविधान नसते तर ..तुम्ही आजही सती गेला असता , तुमचे केस भादरले आसते ; तुम्हाला शिक्षणाचा हक्क नसता !
आज विश्वस्तपदी बसलात ती या महापुरुषांची देन  !
नाही तर तुम्ही या धर्माप्रमाणे  पायातली वहान होता ! माहितीय ? उठता बुक्की बसता लाथ मारायची वस्तू ! पोरं जन्माला घालायचं मशीन !
   आज जे कॅमेरासमोर उभं राहून चुरुचुरु बोलताय ना ..ज्या धर्मासाठी  ..त्या धर्मात तुम्हीसुध्दा महार मांगाच्या लायकीच्या ..होतात ! अस्पृश्य होता, हे विसरु नका.

   देशातलं, राज्यातलं वातावरण ज्या उन्मादानं तापवलं जातंय , ते पाहून कुणाही विवेकी माणसाला यातना ,चीड , संताप , दुःख, हसू आणि आसू या क्रमाणे उद्विग्नता येईल ; पण या तुपकट चेहऱ्याच्या संघवाल्यांना अधिकच चेव चढेल ..कारण काही घडवायचं नाही .माञ सगळं विस्कटून टाकायचं ही आहे संघनीती !

   या निमित्ताने आमच्या विकासाभिमुख मुख्यमंञ्यांना जाहीर आव्हान द्यायचंय.
पंजाबच्या अकाली दलाला आणि काश्मिरच्या पीडीपीला "भारतमाता की जय",म्हणायला लावा, आणि मग आम्हाला इशारे द्या .

लेखक - संजय पवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

फक्त वाचू नका...!
विचारही करा.....

Comments

Popular posts from this blog

विद्रोही तुकाराम

मासिक पाळी, माझी आणि तिची

रक्तदाता यादी