चर्चा कट्ट्यावरची
मित्रहो ,
मघापासून जी चर्चा झाली ती पाहून नक्कीच अनेकांनी अनेक प्रकारे विचार केला असेल
बऱ्याच लोकांना आवडलं असेल नसेल, खटकलं असेल , वाईट देखील वाटलं असेल
पण धर्म आणि श्रद्धा या सारख्या नाजूक विषयावर चर्चा बऱ्याच वेळा लोक करत नाहीत, व त्या विरुद्ध बोलणाऱ्याच्या बद्दल बरेच गैरसमज करून घेतात
आपले गैरसमज झाले असतील तर दूर व्हावेत व नेमका हेतू काय होता हे स्पष्ट होण्यासाठी थोडा वेळ काढून समजून घेतले तर खूप बरं होईल
तसं पाहिलं तर मी पहिल्यापासून असा न्हवतो
मी सुद्धा काही वर्षांपूर्वी श्रद्धाळू होतो
आज ही मला रामरक्षा, हनुमान चालीसा, पाच ही आरत्या , स्तोत्र अगदी तोंड पाठ आहेत जी मी लहानपणापासून म्हणत होतो ( का म्हणतोय ते देखील माहित नसताना , देव आणि धर्माविषयी *का?* हा प्रश्न विचारणे भारतात खूप महागात पडू शकतो)
मला घरात शिकवले गेले,
या फोटो मध्ये दिसतो तो देव
या मूर्ती मधे दिसतोय तो देव
मी पण या वर विश्वास ठेवला आणि श्रद्धाळू झालो
मग मला घेऊन ते देवळात गेले आणि इथे नियमित येत राहा असा सल्ला दिला, आणि जर नाही आलास तर तुला देव शिक्षा करेल, कोप होईल, अशी धमकी वजा भीती घालण्यात आली, मी भित्रा होतो , मी घाबरलो, माझ्यावर देवाने नेहमी प्रसन्न राहावे म्हणून मी पण तो सल्ला पाळू लागलो
जो तो वर ठरला होता, त्या वारीच त्या देवळात जाणे इतर वारी इतर देव होते
प्रत्येक देवाचा एक ठराविक वार ठरला असायचा ,( अजूनही आहे)
म्हणजे मला देव आणि धर्म यांची ओळख करून दिली ती घरच्यांनी आणि त्यात चुकीचं पण काहीच न्हवतं त्यांच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने ते बरोबरच होते
(तसंही , नियमित देवळात जाणारा माणूस आपल्याकडे सभ्य आणि सुसंस्कृत मनाला जातो, मग बाहेर तो कसा का वागेना )
मग माझ्या कर्माने माझी मैत्री झाली क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुलें शी झाली आणि
त्यांनी मला सांगितले कसा धर्माचा स्वीकार करायला भाग पाडले जातंय , पूर्ण चातुर्वर्ण व्यवस्था माणसाला धर्माच्या नावाखाली गुलामगीरी ची वागणूक देतेय, कसा देवविषयी भीती निर्माण करून लोकांना विश्वास ठेवायला भाग पाडले जातंय व धर्माच्या नावाखाली प्रस्थापित कसं विस्थापितांच शोषण करतात, ना ना तऱ्हेच्या पूजा ,शांती, अभिषेक करून कर्मकांड स्तोम माजवला जातंय
(अमीर खान चा PK सिनेमा पहिला तर ही गोष्ट लगेच लक्षात येईल)
हे तेच जोतिबा फुले ज्यांच्यामुळे त्यांची पत्नी शिकली आणि ज्यांच्यामुळे आज आमच्या आया बहिणी शिकल्या व सुशिक्षित झाल्या ,समाजात किंमत मिळवली
(पण त्याच आज कट्टर देवभक्ती करतात, कडक 9 दिवस उपवास करतात, मग आजारी पडलो तरी हरकत नाही)
मग मला थोडं फार खरं चित्र दिसू लागले
(Book: गुलामगिरी by जोतिबा फुले)
मग मैत्री झाली dr बाबासाहेब आंबेडकर यांची कोलंबिया विद्यापीठाच्या 200 वर्षाच्या इतिहासातले सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून गौरव झालेल्या व भारताचे संविधान लिहिलेल्या महान देशभक्ताशी ( अजून आपल्याला संविधान म्हणजे काय हे देखील माहित नसते व आपण देशभक्तीच्या गोष्टी करत असतो, मी हा विषय सध्या शिकवतोय त्यामुळे थोडीफार माहिती नक्कीच आहे)
ज्यांच्यामुळे आपल्याला फी मद्धे सवलत मिळाली, उद्या नोकरीत पण मिळेल
बुक:
1.Riddle's in hinduisum
2.क्षुद्र कोण होते
3. Anhilation of cast's
यांनी मला सांगितले कशी गुलामगिरी आपण जगतोय मानसिक आणि वैचारिक सुद्धा ! देवाचा धर्माचा वापर करून कसा आपल्यावर अन्याय केला जातो आहे, त्यांच्या मते माणसाला धर्मापासून वेगळे नाही करत येऊ शकत कारण ते सॉफ्टवेअर त्याच्या बुद्धीत pre install असते ते जर काढायचे असेन तर दुसरे मारावे लागेल , मग त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला या हेतू ने कि आता लोक मूर्तिपूजा व कर्मकांड बंद करून मानवधर्म स्वीकारतील पण झालं भलतंच लोकांनी बाबसाहेबांनाच देव केलं आणि त्यांची पूजा करू लागले, लोकांनी त्यांना डोक्यात घ्या ऐवजी डोक्यावर घेतले ,
हे पाहिल्यावर मग मी विचार करू लागलो खरंच माणूस धर्मापासून मुक्त होऊ शकतो का ?
तो फक्त माणूस म्हणून जगू शकतो का ?
जगण्यासाठी देव लागतोच का ?
लागत असेल तर मग
बाकीचे प्राणी का देवळात जात नाहीत ?
असे न ना तऱ्हेचे प्रश्न माझ्या मनात घर करून बसले आणि त्यांची उत्तर शोधन्याचा प्रयत्न अजूनही सुरु आहे
मग भेटले देशासाठी तारुण्य कुर्बान करणारे आणि इंन्कलाब झिंदाबाद म्हणत हसत फाशीवर जाणारे शाहिद भगत सिंग
Book: why i am aethist
त्यात त्यांनी ते नास्तिक असण्यामागाची कारणे सांगितली आहेत
मग प्रबोधनकार ठाकरे
(Book: देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे)
बोलले कशी भटसंस्कृती धर्माचा बाजार मांडून अशिक्षित समाजाचं शोषण करीत आहे
माझे खास मित्र dr नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे यांनी आमचे डोळे उघडले व सत्य परिस्थिती लक्षात आली आणि आज मी असा बनलो या मित्रांच्या मुळे
आणि जर वरीलपैकी कोणी चुकीचे असतील तर मी पण आहे हे लक्षात असुद्या
कारण मी पण त्यांची मते जशी च्या तशी न स्वीकारता ती मला पटली म्हणून जास्त जवळची वाटतात
गेल्या 3 वर्षात माझ्या वाचनात अनेक पुस्तके आली वर उल्लेख केलेली त्यापैकीच आहेत
पण आज आपण वाचतोय कुठं
बोलण्यागोदर वाचलं पाहिजे
केस अर्पन करुण कुठे पुण्य मिळते
नारळ अर्पन करुण कुठे भाग्य उजळते
केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार
सोनं- चांदी अर्पन करुण काय मिळते
सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव
काय उपयोग सांग मानवा
अशा या दान धर्माचा ??
कधी शेतक-याला बियाणं
दान देऊन बघ
कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ
कधी एखाद्या निराधार बालकाचा
पालक होऊन बघ
कधी एखाद्या उपाश्याला भरवुन बघ
कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ
कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ
कधी एखाद्या वृध्दाश्रमास
दान करून बघ
कधी एखाद्या आश्रमातील
निराधारांवर प्रेम करून बघ
एकदा दान धर्माच्या व्याख्या
बदलून तर बघ !!
जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ..पुस्तकानं माणसाचं मस्तक सशक्त होत.....
सशक्त झालेलं मस्तक
कुणाच हस्तक होत नसत....
आणि हस्तक न झालेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नसत...!
हे स्विकार(Acceptence) करा
1 ) माझा जन्म कोठे व्हावा ..कोणत्या जाती धर्मात व्हावा..आई वडील कसे असावेत ..हे माझ्या हाती नव्हते ..त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऎवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करुन माझे जिवन नक्कीच सुखी करु शकतो...
२ ) मी स्त्री व्हावे की पुरूष..काळा की गोरा..माझ्या शरिराची ठेवण ..सर्व अवयव ठिकठाक असणे..हे देखिल माझ्या हाती नव्हते..मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे..योग्य ती काळजी घेणे हे माझ्या हाती आहे...
३ ) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती..सामाजिक स्थान..त्यांचे स्वभाव ..हे देखिल माझ्या हाती नव्हते..त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे..
४ ) सगळ्यांनाच सगळे सुख मिळत नाही हा निसर्गाचा नियम आहे..त्या मुळे माझ्या आयुष्यात देखिल काही दुःखे असणारच आहेत..ती दुःखे कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही ..त्यामुळे माझ्या दुःखाचे भांडवल न करता..मी त्या दुःखाचे निराकरण करण्या साठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन..
५ ) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी ..माझ्या संपर्कात येणा-या लोकांनी ..माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे..संयम..म्रुदु भाषा..मंगल कामना हे माझ्या हाती आहे..
६ ) माझ्या आयुष्यात घडणा-या घटना..परिस्थिती ..यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते ..मात्र त्या वेळी साकारात्मक विचार अन योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे..
७ ) हे विश्व मी निर्माण केलेले नाही ..कीवा हे विश्व कसे असले पाहिजे या माझ्या मताला देखिल काही कींम्मत नाही तेव्हा..हे असे का ? ते तसे का ?..असे का नाही ..? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी ..जे चूक आहे..अयोग्य आहे..ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल हे थोडके नसे..
८ ) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुःखी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे...
९ ) आज जरी यश..सुख ..सम्रध्दी माझ्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या अथवा केव्हाही हे नष्ट होवु शकते याची सतत जाणीव ठेवून मी अहंकाराला दुर ठेवले पाहिजे...
१० ) मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत रहाण्या ऎवजी . जे काही मिळाले आहे त्या बाबत मी आभारी असले पाहिजे..जग अधीक चांगले..सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.
पुजेला मांडलेली खारीक आपल्या लहान मुलाने
उचलुन खाल्ली तर त्याच्या गालाफाडात
वाजवणारा बहुजन,तीच खारीक खाऊन भडजीच
पोरग गुटगुटीत होत आहे, याचा आपण कधीच विचार करीत
नाही ,शेतात राब-राब राबुन हाडाची काड
केलेल्या आपल्या पत्नीला ती खारीक खाऊ
घालावी हा विचार पण करीत नाही.
पुजेची तीच खारीक,खोबर,काजु,बदाम
भडजीला देऊन ; दक्षिणा देऊन
त्याच्या पाया पडायचा ही खुप
मोठी गुलामगिरी आहे हे बहुजनांना कधी समजलच
नाही .
पण फुले ,शाहु,आंबेडकरांनी सांगितल
कि ही गुलामगिरी तोडा . अरे
छत्रपती शिवरायांनी एवढे गड-किल्ले बांधले-
जिंकले पण एकाही गडकोटाची पुजा-सत्यनारायण
कधी घातले नाही, कधी मुहुर्त - पंचांग पाहुन
लढाया केल्या नाहीत... मंग
त्या छत्रपती शिवरायांचे मावळे तुम्ही हे
अंधश्रद्धा-कर्मकांड करायच बंद
करा ही गुलामगिरी तोडा .
"भटमुक्त व्हा भयमुक्त व्हा".
कोणतही कार्य करताना बुद्ध, कबिर, रविदास, संत तुकाराम,जिजाऊ, शिवराय,संभाजीराजे,महत्माफुले, सावित्रीमाई, बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना हार घालुन आपले कार्य पार पाडा.
यासाठी तुम्हाला कोणत्याही ब्राम्हण भडजीची गरज नाही, दक्षिणेचे गरज नाही... आपण आता भटमुक्त आणी भयमुक्त झालो पाहिजे ...
तीच खारीक, खोबरे बदाम, काजु आता आपल्या पत्नीला मुलांना चारली पाहिजे ,
दक्षिणा देण्यापेक्षा मुलांना कँम्प्युटर,पुस्तके दिली पाहिजे.
उच्चशिक्षणासाठी परदेशात पाठवले पाहिजे .
विज्ञानवादी झालो पाहिजे, शाहणे झालो पाहीजे निरोगी - आनंदी झालो पाहिजे...
पटलं तर चार मित्रांचे ही डोळे उघड़ा...
हाच शुद्ध हेतू होता बस्स
मला माहित आहे एवढा मोठा मेसेज वाचायला आपल्याकडे वेळ नसेल
पण ग्रुप मधील 30-40 जणापैकी
10 जणांनी वाचला आणि 3-4 जण जरी शहाणे झाले तर मी एवढं type करण्यात घालवलेले 2-3 तास समाजाच्या कामी आले म्हणायचे
स्त्री वर्गाकडून जास्त अपेक्षा आहे, कारण एक शिकलेली शहाणी स्त्री कुटुंब शिक्षित करू शकते
धन्यवाद🙏
आपलाच - विनायक
Comments
Post a Comment